कुर्डूवाडीतील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा ही नितीन गडकरी शहरवासियांच्या अपेक्षा.

कुर्डूवाडी:(प्रतिनिधी: नसीर बागवान) रेल्वे गेट क्रमांक 38 ने शहराची दोन भागात विभागणी केली आहे या ठिकाणी उड्डाणपूल करण्याची आग्रही मागणी नागरिकांची आहे.या प्रश्नाबाबत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्यांच्या सोलापूर दौऱ्यात हा प्रश्न धसास लागणार का असा प्रश्न कुर्डूवाडी कर यांनी उपस्थित केला आहे.रेल्वे जंक्शनमुळे कुर्डुवाडी ची शोभा वाढली अर्थकारणाची वाढ झाली तसेच शहराचे दोन तुकडे केले एका बाजूला विविध शासकीय कार्यालय मुख्य बाजारपेठ शाळा रुग्णालय तर एका बाजूला रेल्वे वसाहत या दोन्ही भागांना जोडणारा रस्ता अर्थात गेट क्रमांक 38 हे गेल्या 3 वर्षापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही भागात दळणवळण यंत्रणा कोलमडून पडली.
रेल्वे गेट बंद पडल्यामुळे दोन्हीकडील भागातील लोकांना अडचण झाली आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग करण्याचे ठरवले असले तरी तरी या भुयारी मार्गाला नागरिकांचा विरोध असल्याचे दिसून येत आहे उड्डाणपूल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नगरपालिकेकडे 25 कोटीची मागणी केली होती.त्या अनुषंगाने नगरपालिकेने राज्य शासनाकडे पाठपुरावा ही केल्याचे समजते परंतु पाठपुराव्याची सत्र संपुष्टात आले. यापूर्वी कुर्डूवाडी तील सामाजिक कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना उड्डाणपूल साठी निवेदन देऊन प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते त्यावेळी नामदार गडकरी यांनी उड्डाणपूल साठी सकारात्मक ता दर्शवली होती. ज्या ठिकाणी उड्डाणपूल ची गरज आहे.त्या ठिकाणी निधीची पूर्तता करण्याचे नितीन गडकरी यांनी जाहीर आश्वासन दिले होते सध्या ते सोलापूर दौऱ्यावर आहेत विविध ठिकाणी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. रस्ते म्हणजे विकास वाहिन्या दोन रस्ते जोडणारे पूल हे तेवढेच महत्त्वाचे ना नितीन गडकरींनी उड्डाणपूल ला मान्यता देऊन कुर्डूवाडी चे दोन भाग जोडण्याचे काम करून शहरवासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कुर्डूवाडी करातून होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here