किसान काँग्रेस व इंदापूर काँग्रेसने निमगाव केतकी बाह्यवळण रिअलाईन्मेंट रद्दसाठी पाठिंबा देत तहसीलदार यांना दिले निवेदन.

निमगाव केतकी: संत तुकाराम पालखी मार्ग बारामती ते इंदापूर प्रस्तावित मार्गात निमगाव केतकी येथील बाह्यवळण रस्ता रिअलाईन्मेंट रद्द करणे साठी निमगाव केतकी येथील शेतकरी गेली तीन महिनेहुन जास्त काळ आंदोलन करत आहेत.सदर बाह्यवळण रस्ता झाल्यास बरेच अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार असुन त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. असे मत आंदोलक शेतकरी यांचा आहे.
सदर शेतकऱ्यांच्या आंदोलनास किसान काँग्रेस व इंदापूर काँग्रेसने पाठिंबा दर्शविला असून बाह्यवळण रिअलाईन्मेंट रद्दसाठी मुख्यमंत्री,बांधकाममंत्री, महसूलमंत्री,पालकमंत्री यांना तहसीलदार इंदापूर यांचेकडे निवेदन देऊन सदर आंदोलकांच्या मागण्या कळवल्या असल्याचे किसान कॉंग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी सांगितले.काँग्रेसन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे नुकतेच संपूर्ण देशाने राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्ली येथील पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी पाहिले आहे.सदर बाह्यवळण रस्ता रिअलायमेंट रद्द होईपर्यंत शेतकरी आंदोलकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन काँग्रेसचे सरचिटणीस नितीन राऊत यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी इंदापूर कॉंग्रेसचे सरचिटणीस संतोष शेंडे, राहुल आचरे युवक काँग्रेसचे मिलिंद साबळे व अरुण राऊत उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here