किंडर जॉय स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी (वैभव पाटील): सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन इंडिया, संचालित प्री -प्रायमरी ‘किंडर जॉय स्कूल’, वाशिंद. यांच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाणे जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार आणी शहापूर गजालीचे संपादक मा. संजय भालेराव साहेब, विठ्ठल भेरे (माजी उपाध्यक्ष जि.प.ठाणे ), संदीप पाटील ( राष्ट्रवादी वासिंद शहर अध्यक्ष ) राजेश निकम ( ब.स.पा. ठाणे जिल्हा प्रभारी ) ऍड. प्रतिभाताई कांबळे ( ठाणे जिल्हा महिला आघाडी व वकील संघटना, मुंबई.) राजेंद्र म्हसकर, ( माजी सरपंच वासिंद.) सिद्धार्थ साळवे ( महासचिव – ठाणे जिल्हा बसपा ) रवींद्र पवार सर ( मुख्याध्यापक ) प्रकाश वाघमारे (अध्यक्ष – युग प्रतिष्ठान,) आनंद गायकवाड, ( बसपा वासिंद शहर अध्यक्ष ) राहुल काठोळे ( शहापूर अध्यक्ष आप ) आशा जाधव ( अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ ) सुभाष कळसकर (केंद्र प्रमुख शेरे ) रवींद्र जाधव (वाशिंद विभाग वंचित बहुजन आघाडी) आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते छ.शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले..
या कार्यक्रमांची सुरवात शिवव्याख्याते मनोहर जाधव यांनी आपल्या शिवव्याख्यानातून केली. तर लहान चिमुकल्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅम्प वॉल्क, फॅन्सी ड्रेस, वकर्तृत्व आणि पोवाड्याचे सादरीकरण केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातले प्रसिद्ध पपेट आर्टिस्ट मा.रमेश जी भंडारी आणि त्यांचा बोलका बाहुला यांनी उपस्थित प्रेक्षकांना भरभरून हसवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री वाघ व राजश्रीराणी वाघ या मायलेकींनी अतिशय उत्कृष्टपणे केले. त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धामध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मेडल, बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या संमेलनामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये झालेल्या रॅम्प वर्क स्पर्धेत सौ. रिद्धी राहुल धसाडे यांना ‘मिस युनिव्हर्स ऑफ द स्कूल’ या नामांकनाने गौरविण्यात येऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कराटे स्पर्धेत समीक्षा चोरगे,( vmfz, Vasind ) हिने जिल्हास्तरीय DSO स्पर्धेत – रौप्य पदक, तालुकास्तरावर सुयोग जाधव- रौप्य पदक तसेच स्विमिंग मध्ये परणिता फरडे, सिद्धेश शेलार, मंत्रा घोडविंडे, क्रिकेटमध्ये दक्ष रवींद्र पवार , आशा विविध क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल या सर्वांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
पुढील बूम बूम डान्स स्पर्धेचे सूत्रसंचालन गणेश आहिरे सर यांनी केले. तर वैभव दोंदे यांनी माऊथ ऑर्गनच्या साहाय्याने जुन्या आणि नवीन गाण्याचा ठेका धरत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुंबई, आणि ठाणे जिल्ह्यातील जवळपास 36 स्पर्धक आणि 1200 हुन अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. यामध्ये अनुक्रमे पाच विजेत्या स्पर्धकांमध्ये सानिका लाटे, अवनीश गुप्ता, वाल्मिकी प्राथमिक शाळा अटाळी, लास्या मोरे ज्ञानेश्वरी बोदडे यांना, रामभाऊ घोडेस्वार गुरुजी (अध्यक्ष -श्रावस्थी बुद्ध विहार ) आणि गुरुनाथ गायकवाड (संस्थापक अध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं.स. शहापूर) यांच्या हस्ते आणि प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलेल्या स्पर्धकांना देखील ट्रॉफी गिफ्ट प्रमाणपत्र तसेच रोख रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले..
कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये संस्थेचे सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड यांनी संस्थेची वाटचाल आणि शाळा स्थापनेचा मुख्य हेतू ध्येय उद्दिष्टे उपस्थित विद्यार्थी पालक आणि प्रेक्षक यांना सांगितले आणि संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन केले..
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे डॉ. हरीश वायदंडे,( जिल्हा युवा पुरस्कृत, महाराष्ट्र शासन ) गोपेश गायकवाड,( डोरेक्टर Taz Dance studio ) पुनम गांगुर्डे, ( किंडर जॉय स्कुलच्या मुख्य व्यवस्थापक- संचालिका ) आणि कार्याध्यक्ष डॉ.अभिजीत इंगळे, आदी यांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here