👉 ठाणे जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांनी दिले चौकशीचे आदेश …
वैभव पाटील : प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचारी आपल्या पसंतीच्या विविध दहा प्रकारच्या सन व उत्सव याकरिता बारा हजार पाचशे रुपये सन अग्रीम घेऊ शकतो यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सन अग्रिम देण्याची तरतूद आहे .त्यानूसार भिवंडी तालुक्यातील 20 मागासवर्गीय शिक्षकांनी सन अग्रिम मागणी दीड महिना अगोदर भिवंडी पंचायत समिती कार्यालय येथे केली होती मात्र भिवंडी तालुका प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलम पाटील व कार्यालयीन कर्मचारी यांनी या 20 शिक्षकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व सन अग्रिम मिळू नये याकरिता उशिरा म्हणजे 11 एप्रिल 23 रोजी सदर 20 प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषद येथे पाठवले .उशिरा प्रस्ताव आल्याने जिल्हा परिषद ठाणे यांनी सदरच्या प्रस्तावानुसार सन अग्रिम रक्कम देता येणार नाही असे स्पष्ट केल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या उद्देशाने केलेली आर्थिक मागणी मान्य न झाल्याने सबंधित सर्व शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सदरची बाब ही जातीय द्वेशापोटी झाल्याचे आढलून येत आहे .या प्रकरणामुळे शिक्षक वर्गात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
यापूर्वीही प्रभारी गटशिक्षण आधिकरी निलम पाटील यांना कास्ट्राइब शिक्षक संघटनेने वारंवार पत्र व्यवहार करूनही शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बैठकीस वेळ न देणे,मागासवर्गीय संघटना पदाधिकारी यांनी शिक्षकांच्या कामानिमित्त केलेले फोन न उचलून अन्याय करणे,कार्यालयात भेटीसाठी ताटकळत ठेवणे असे प्रकार मागील 4 वर्षापासून करून आपला जातीयवादी चेहरा उघड केला आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सन अग्रिम न मिळाल्याच्या बाबीवर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे माननीय गटविकास अधिकारी भिवंडी यांना तक्रारीचे निवेदन सादर करून त्वरित या प्रकरणाची चौकशी करावी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मागासवर्गीय कर्मचारी व शिक्षक यांच्या न्याय्य मागण्यांची सातत्याने हेळसांड करणाऱ्या जातीयवादी गटशिक्षण अधिकारी यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली आहे सदर बाबतीत योग्य निर्णय न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी संघटनेच्या वतीने विजयकुमार जाधव राज्य उपाध्यक्ष,संतोष गाढे कोकण अध्यक्ष ,अशोक गायकवाड कोकण उपाध्यक्ष ,दिनेश शिंदे कोकण कार्याध्यक्ष ,अनिल गायकवाड ,मनीषा खंडारे,वैशाली तांडेल ,शारदा वाहने आदी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आला आहे ,या प्रकरणी मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना चौकशी चे आदेश मा मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांनी दिले आहेत.
Home Uncategorized कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.