काय तो दांडा….काय ते ढुं… अशी बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे अखेर शिंदे गटात सामील.

काय तो दांडा, काय ते ढुं… असं म्हणत एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला आहे.उद्धव ठाकरेंसह असलेल्या अनेकांनी त्यांची साथ सोडून ते शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला गेलेल्या आमदारांमध्ये संतोष बांगर यांचा समावेश नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी मी निष्ठावान असून बंडखोर आमदरांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. अशाच प्रकारे बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणत सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या दहीसर येथील प्रभाग क्रमांक सातच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे देखील शिंदे गटात सामील झाल्या आहेत.शीतल म्हात्रे यांच्या सोबतच पश्चिम उपनगरातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा शीतल म्हात्रे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेची वाघीण अशी त्यांची ओळख आहे. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत.
👉 दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसोबत आम्हाला राहावं लागलं; शीतल म्हात्रे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जातोय त्याला आपल्या सर्व पदाधिकाऱ्यासोबत पाठिंबा दिल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसोबत आम्हाला राहावं लागलं त्यावर काही बोलता आलं नाही. शिवसैनिकांच खच्चीकरण झालं होतं आम्ही जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही. मुंबईतील 5 आमदारांनी आमच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सभागृहात आल्यानंतर त्यांनी कोणाला मतदान केले हे सगळ्यानी पाहिलेलं आहे. काही लोक तर म्हणत होते मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा पण काही झालं का ? असं म्हणत म्हात्रे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here