इंदापुर: भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी श्री.किरण बाळासो काळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. इंदापुर तालुक्यातील कट्टर भाजप नेते व सामाजिक कार्यकर्ते, पळसदेवचे युवा नेते किरण काळे यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. यावेळी कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष निलेशजी बडदे यांच्या हस्ते किरण काळे यांना निवडीचे पञ देण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक-काका वणवे, महाराष्ट्र प्रदेश अल्प संख्यांक मोर्चाचे सचिव मूबारक सय्यद, पुणे जिल्हा अल्प संख्यांक आघाडी उपाध्यक्ष अक्रम शेख उपस्थित होते.
निवडीनंतर किरण काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी यांनी राबविलेल्या योजना व भाजपचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हर्षवर्धन पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले.