राशीन प्रतिनिधी: महेश कदम
राशीन: पारंपरिक पिकांचा पाहिजे असा नफा होत नसल्याने गतवर्षी शेतकरी पिकपालट व जास्त नफ्याच्या हेतूने वेगवेगळ्या पिकांकडे वळली आहेत.त्यातील खरिपातील महत्वाचे नगदी पीक कापूस याची बऱ्याच प्रमाणात लागवड झाली आहे.आणि आता याच कपाशी पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी ई. किडींच्या प्रादुर्भावामळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यातील राशीन भागामध्ये या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्याचे दिसून येत आहे .विविध फवारण्या करूनही म्हणावा असा फायदा होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे प्रतिनिधी महेश कदम यांनी काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की या किडी नुसत्या फवारणी घेऊन जाणार नाहीत. शेतकरी फक्त डोळ्यांनी किडींची संख्या जास्त दिसल्यावरच फवारणी घ्यायचा निर्णय घेतात तो पर्यंत त्या किडींची दुसरी पिढी तयार झालेली असते. त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी फवारण्यामध्ये सातत्य ठेवणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच महत्त्वाचे म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन आहे. या मध्ये 10 ते 20 टक्के जैविक कीटकनाशकांचा वापर 25 ते 30 टक्के सेंद्रिय औषधांचा वापर आणि 30 ते 40 टक्के रासायनिक कीटकनाकांचा वापर महत्त्वाचा ठरेल असे सांगितले जात आहे.
Home Uncategorized कापूस पिकावरील मावा, तुडतुडे किडींमुळे मुळे शेतकरी हैराण. वाचा सविस्तर कृषी वृत्तांत.