– राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी दिली भेट
काटी: वडील आणि लहान भावासोबत शाळेला निघालेल्या एका १२ वर्षीय मुलीला खडी वाहून नेत असलेल्या एका हायवा ट्रक खाली दुर्दैवी निधन झाल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडली. काटी वडापुरी रस्त्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत तृप्ती नानासाहेब कदम (रा. काटी, ता. इंदापूर) या ७ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.राजवर्धन पाटील यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली.रस्त्या अपघातामुळे शाळकरी मुलीचा झालेला मृत्यू ही घटना अतिशय दुर्दैवी असून या दुर्दैवी घटनेमुळे कदम कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले असून त्यातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.
Home Uncategorized काटी येथील अपघातामुळे झालेला शालेय मुलीचा मृत्यू ही घटना अत्यंत दुर्दैवी- राजवर्धन...