कांदे घ्या ओ काका… कोबी घ्या.. काकडी घ्या..20 रू किलो.. चिमुकल्यांनी भरवला गागरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवडे बाजार, तब्बल वीस हजाराची झाली उलाढाल.

👉 गागरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडे बाजार, तब्बल 20000 रुपयांची झाली उलाढाल.
गागरगाव:इंदापूर लहान मुलांना आर्थिक ज्ञान समजण्यासाठी त्याचप्रमाणे लहान वयातच मुलांना व्यवसायाची ओळख होण्यासाठी व त्या व्यावसायातून पैशाची देवाणघेवाण समजण्यासाठी गागरगाव येथील जिल्हा परिषद शाळेने एक अनोखा उपक्रम अंतर्गत आठवडे बाजार भरवण्यात आला होता.
या उपक्रमामध्ये 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि या उपक्रमामध्ये तब्बल वीस हजाराची आर्थिक उलाढाल झालेली होती. कोणी कांदा घ्या..
तर कोणी कोबी घ्या….काकडी घ्या…. वीस रुपये किलो…. दहा रुपये किलो… हरभरा पेंडी घ्या…वीस ला 2 अशा चिमुकल्यांच्या आवाजाने आठवडे बाजार अगदी दणकून गेला होता.या बाजारात तब्बल २० हजारांची आर्थिक उलाढाल झाली असून बाजारातील खरेदीसाठी गावातील पालक वर्ग तसेच महिला पुरुष ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.या बाजारामुळे शाळेचा परिसर आठवड्याचा बाजार असल्यासारखा उत्तमरीत्या दिसत होता. लहान मुले बाजारातील वस्तू, फळे, भाज्या यांची विक्री करीत असताना पालक वर्ग अतिशय कुतूहलाने पाहताना दिसले. बाजारामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. या आठवडा बाजार भरवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले, शिक्षिका मंदाकिनी हेबाडे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले.यावेळी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी चे संचालक सुहास मोरे, प्रशांत घुले संतोष घोडके,अनिल गायकवाड, रविंद्र तनपुरे, तुकाराम बुटे, भालचंद्र भोसले, प्रविण ढुके,नजीर शिकिलकर, अमोल बोराटे,औदुंबर कचरे,आबा वीर, ग्रामपंचायत सदस्य पोपट गलांडे ,आजिनाथ कचरे, देविदास वीर, नवनाथ कचरे, रामदास जाधव, भारत जाधव, संतोष मिंड ,धर्मराज धुमाळ, बाळासाहेब नरळे, देविदास वीर, नितीन मिंड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश भोसले, तात्याराम सातव, नाना धुमाळ बापू धुमाळ, अरुण शिंदे, बाळू शिंदे, नाना भोसले, उमेश पवार, संजय नरळे, काळू आगवणे, अनिल धुमाळ ,महेश धुमाळ ,अमोल सातव ,सचिन मिंड ,सचिन लोंढे ,दीपक मिंड, रघुनाथ लोंढे ,बाळू जाधव, मोहन कचरे ,सचिन आवटे, सुरज विर परशुराम चोरमले व इतर पालक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here