कसेबसे तीन खासदार असलेल्या राष्ट्रवादीने बीजेपी वर बेतालपणा करू नये, तुमचे जहाज डूबत चालले आहे त्यावर लक्ष द्यावे.- गजानन वाकसे.

इंदापुर ता.प्रतिनिधी : सचिन शिंदे

इंदापूर : काल निमगाव केतकी येथे भाजपा वर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या टीकेला आता भाजपा नेते गजानन वाकसे यांनी आपल्या स्टाईलने प्रतिउत्तर दिले आहे.भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस भविआ तथा प्रभारी पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा गजानन वाकसे म्हणाले की,”भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात सत्तेवर होते तेव्हा इंदापूर मार्केट कमिटी मध्ये झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनसमक्ष विद्यमान राज्यमंत्री भरणे बोलले होते इंदापूर तालूक्यात आपला खरा शत्रू भारतीय जनता पक्ष नाही तर काॅग्रेसच खरा शत्रू आहे.
२०१९ च्या विधानसभेला पक्षाने डावलले तर काय करायच या चिंतेत हेच भरणे भारतीय जनता पक्षाशी जवळीक केली होती यापेक्षा विशेष म्हणजे भरणे फक्त आमदार च होते तेव्हा त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांच्या बरोबर सलोख्याचे संबंध ठेऊन “मी तुमचाच आहे”अस म्हणत कोट्यवधी चा निधी पदरात पाडून घेतला होता आणि आज तेच भरणे भारतीय जनता पक्षावर जातिवादाची टिका करत आहेत याचा नैतिक अधिकार भरणेंना नाही. तालुक्यात जातीयवाद कधिपासून चालू झाला आहे ते सगळी जनता जाणते भारतीय जनता पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष च मुस्लिम आहेत त्या मुळे भरणे यानी भान ठेऊन जबाबदारी ने बेतालपणा करावा.त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की, आगामी काळात नगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन आपणच जातीचे विष पेरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत,राष्ट्रवादी चे जहाज आता बुडू लागले आहे तुमचे बळ निट निटके तीन खासदारांच्या पुरते सुध्दा नाही याउलट लोकांच्या मनात बीजेपी बद्दल आदर असल्याने देशात 303 पेक्षा जादा खासदार देशाने निवडून दिले आहेत. त्यामुळे आपण काय आणि कोणाबद्दल बोलतोय याची जाण ठेवावी असा घणाघात भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस भविआ तथा प्रभारी पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा गजानन वाकसे यांनी आज बोलताना माध्यमांशी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here