कविवर्य तुषार ठाकरे यांच्या अक्षर तुषार कविता संग्रहाचे प्रकाशन…

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी कविवर्य तुषार ठाकरे यांच्या अक्षर तुषार या कविता संग्रहाचे त्यांची कन्या दिपश्री हिच्या पाचव्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिमागदार प्रकाशन सोहळा हॉटेल मुनलाईट वाडा येथे पार पडला.तुषार ठाकरे यांचे हे तिसरे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या आधी ठाकरे यांनी आज ही आणीबाणी व अनामिक मी या कविता संग्रहांचे प्रकाशन केले आहे .अक्षर तुषार पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी कविवर्य तुषार ठाकरे यांनी या पुस्तकाच्या विक्रीतून जो निधी जमा होईल तो गरीब आणि गरजू लोकांना साठी खर्च केला जाईल हे जाहीर होते.ग्रामीण भागातील नावा रूपाला येणारे कविवर्य तुषार ठाकरे यांचं यावेळी अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर प्रसंगी सौ वैदही वाढाण अध्यक्ष जि. प .पालघर यांनी सांगितले की प्रत्येक माणसाने पुस्तक वाचले पाहिजे अलीकडच्या काळामध्ये पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी होत आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये पुस्तकांचा विसर पडत आहे .वाचाल तर वाचाल ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे व आपल्या बौद्धिक क्षमतेचा विकास केला पाहिजे असे बोलून कविवर्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी मा. रमेश जी पाटील ज्येष्ठ पत्रकार लोकसत्ता, मा महेशजी धानके साहित्यिक, मा.उमेशजी मेरे संपादक दैनिक अग्रलेख, मा. प्रकाश पवार प्रकाशक शब्दांन्वय, मा. विजयजी जोगमार्गे कवी ,लेखक प्रकाशक ,मा. स्वप्निलजी पाटील अध्यक्ष अभिजीत मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य ,मा. रविंद्र यशवंतराव देशमुख मुंबई विभागीय अध्यक्ष कोकण मराठी पत्रकार संघ,मा.सरिताताई साने शिवसेना संघटिका पिंपरी चिंचवड विधानसभा ठाकरे गट,मा. भक्ती वलटे जिल्हा सदस्य,अरुण ठाकरे जिल्हा परिषद योगेश, तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून कविवर्य तुषार ठाकरे यांना शुभेच्छा देऊन आणखी लेखन करण्याची इच्छा व्यक्त होती.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतावणे व निखिल वाकले यांनी होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here