⏰ “कुठल्या विभागाचा कसा निधी आणायचा यामध्ये आपण माहीर आहोत”- आमदार दत्तात्रय भरणे. वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी केला भरणे मामा यांचा सत्कार

गेल्या दोन वर्षापासून इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भरघोस निधी येत आहे आणि याचे संपूर्ण श्रेय माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निश्चितच आहे. महाराष्ट्रात निधी खेचून आणण्यामध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा दुसरा नंबर आहे असे म्हटले जाते अनेक वाड्यावस्त्या व गावागावांना जोडत दळणवळण सुलभ करण्याचे काम आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता,इंदापूरसाठी जे-जे म्हणून आणता येईल यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असून कुठल्या विभागाचा कसा निधी आणायचा यामध्ये आपण माहीर आहोत.त्यामुळे निधीच्या बाबतीत इंदापूरच्या पॅटर्नची महाराष्ट्रभर चर्चा असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी भरणेवाडी येथे दिली.रविवारी वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब येथील सर्व शिक्षकांचा स्टाफ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार व सत्कार करण्यासाठी आलेला होता त्याचे कारणही तसेच होते. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळम येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाने सतत येत असतात. मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या वेळी आमदार भरणे यांना विद्यार्थ्यांनी सभागृह व शौचालय बांधण्याची मागणी केली होती. आमदार भरणे यांनी त्वरित या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कदम यांच्याशी चर्चा केली व माहिती घेतली. सभागृह व शौचालयाची आवश्यकता आहे अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली त्यांनी त्वरित किती बजेट लागेल याची चाचपणी केली असता या कामासाठी २० लाखाची गरज आहे असा प्राथमिक अंदाज काढला परंतु २० लाख कमी पडू नये म्हणून आमदार भरणे यांनी या कामासाठी त्वरित २५ लाख रुपये मंजूर केले आणि याच गोष्टीमुळे वालचंद विद्यालय व ज्यूनियर कॉलेज कळंब या संस्थेचा सर्व स्टाफ आमदार भरणे यांचे आभार मानण्यासाठी रविवारी भरणेवाडी येथे आले होते.यावेळी वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन रामचंद्र कदम म्हणाले की, “आमच्या संस्थेवर आमदार दत्तात्रय भरणे यांचे विशेष प्रेम आहे आजपर्यंत आम्हाला व आमच्या गावाला मामांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळत गावाचा व शाळेचा कायापालट झाला आहे त्यामुळे आमदार भरणे मामांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मामांची कार्यपद्धत्व आपलेपणा यामुळे आम्हाला आमदार भरणे यांचा अभिमान वाटतो”.अशा शब्दात संस्थेच्या अध्यक्षांनी आभार मानले.याप्रसंगी वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंबचे अध्यक्ष श्री रामचंद्र दादा कदम,श्री मधुकर बापु पाटील,मा.पंचायत समिती सदस्य श्री सुहासदादा डोंबाळे पाटील, सचिव श्री सुर्यभान मोहिते,सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत, प्राचार्य श्री बी.के.सर्वगोड सर, पर्यवेक्षक श्री राजेंद्र माळवदकर सर,श्री सचिन सावंत सर यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या दिवशी योगायोगाने याच संस्थेतील कर्मचारी राऊत सर यांचा वाढदिवस होता आणि राऊत सर म्हणजे आमदार भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात आमदार भरणे यांनी राऊत सर यांचा सत्कार करत व केक कापत वाढदिवस साजरा केला.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here