कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील व माजी आमदार राजेंद्र तात्या घोलप यांच्या दूरदृष्टीने स्थापन केलेल्या इंदापूर अर्बन बँकेस पुन्हा एकदा चांगले दिवस – चेअरमन देवराज जाधव.

इंदापूर:कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील व माजी आमदार राजेंद्र तात्या घोलप यांच्या दूरदृष्टीने स्थापन केलेल्या इंदापूर अर्बन बँकेस पुन्हा एकदा चांगले दिवस आलेले असून यावर्षी बँकेने 10 टक्के लाभांश जाहीर केला असून बँक ड मधून ब वर्गामध्ये आल्याचा विशेष आनंद होत आहे असे मत इंदापूर अर्बन बँकेच्या पंचविसाव्या सर्वसाधारण सभेत बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांनी व्यक्त केले.खरंतर बँकेची ही 25 वी सर्वसाधारण सभा मोठ्या थाटामाटात होणार होती परंतु बँकेचे माजी सभासद तथा मार्गदर्शक गोकुळ शेठ शहा यांच्या दुःखद निधनामुळे सत्काराचे व इतर कार्यक्रम रद्द करून फक्त वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही एस तावरे यांनी वाचनकेली . वार्षिक सर्वसाधारण सभा चालू होण्यापूर्वी सर्व सभासदांनी संचालक मंडळांनी कै.गोकुळ शेठ शहा यांना श्रद्धांजली अर्पण केली.बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांनी अध्यक्ष भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना बँकेविषयी माहिती दिली यात त्यांनी सांगितले की 31 मार्च 2022 अखेर बँकेचे अधिकृत भाग भांडवल 10 कोटी रुपये इतके असून सद्यस्थितीत ठेवी 129 कोटी वर पोहोचले आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेने 10 टक्के लाभांश जाहीर करत आहे.ठेवीदार सभासद व कर्जदारांनी केलेल्या सहकार्यामुळे बँकेचे खराब दिवस संपून आता पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील उपस्थित होते ते म्हणाले की, आपल्या बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून बँकेच्या कामकाजामध्ये नवीन दिशा ठरवणे बाबत सातत्याने मार्गदर्शन होत आहे त्यांनी बँकेस वेळोवेळी भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सदैव अमूल्य सहभाग आहे. बँकेस चांगल्या ठेवीदारांबरोबरच महत्त्वाचे म्हणजे चांगले कर्जदाराची आवश्यकता असते त्यामुळे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी यापुढे चांगल्या लोकांनाच कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे. बँकेला चांगले दिवस आणण्यासाठी संचालक मंडळ कर्मचारी व सर्व सभासदांचे त्यांनी आभारही मानले.सन 2021/22 रोजीच्या आर्थिक वर्षात कोरोना महामारीची परिस्थिती असताना देखील बँकेने थकीत कर्ज वसुलीचे उद्दिष्ट साध्य करून निव्वळ एनपीए कर्जाचे प्रमाण 2.25% राखलेले असल्यामुळे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकेस गौरवण्यातही आले आहे याचा विशेष आनंद आहे असे मत बँकेचे उपाध्यक्ष सत्यशील पाटील यांनी व्यक्त केले. यापुढेही बँकेने सर्व अत्याधुनिक यंत्रणेमार्फत जास्तीत जास्त सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे माहिती सत्यशील पाटील यांनी दिली.या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील, विलासराव वाघमोडे, शेखर पाटील,नानासाहेब शेंडे, सागर गानबोटे, राजू जठार,गणेश घाडगे तसेच बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हाईस चेअरमन सत्यशिल पाटील, संचालक मंडळांमधील रामकृष्ण मोरे, अमरसिंह पाटील,विलासराव माने,अशोक शिंदे,संदिप गुळवे, ॲड विकास देवकर,दादाराम होळ,आदिकुमार गांधी,लालासो सपकळ,भागवत पिसे,अविनाश कोतमिरे,उज्वला गायकवाड,डॉ.आश्‍विनी ठोंबरे,उल्हास जाचक,विजय पांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे इत्यादी उपस्थित होते. त्याचप्रमाणे इंदापूर अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here