कर्मयोगी कारखान्याने अनेक चढ-उतार पाहिले असून संघर्षातून सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले- माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर प्रतिनिधी- संतोष तावरे
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि.महात्मा फुलेनगर, बिजवडी ता. इंदापूर जि. पुणे कारखाना पंचवार्षिक निवडणूक सन 2021- 26 करिता बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आज जाहीर सत्कार समारंभ इंदापूर अर्बन बँक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने अनेक चढ-उतार पाहिले असून संघर्षातून सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असल्याचे सांगितले.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी तसेच विविध संस्था, सभासद शेतकरी, गावपातळीवरील पदाधिकारी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी ज्यांनी निवडणूक बिनविराध करण्यासाठी उमेदवारी अर्ज माघे घेतले तसेच इच्छुक उमेदवारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने अनेक संघर्ष चढ-उतार पाहिले आहे. भाऊंनी खाजगी असलेला हा कारखाना सहकारामध्ये आणला.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासद शेतकरी वर्गाने जो विश्वास दाखवला तसेच यासाठी जी भूमिका घेतली त्याला सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सभासद शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संघटना, प्रादेशिक पक्ष यांनी जे सहकार्य केले त्याचे त्यांनी स्वागत केले.सध्य परिस्थिती, कोरोना कालखंड लक्षात घेता आता अधिक जबाबदारी घेऊन,अधिक पटीने काम करून सभासद हितासाठी कारखानदारी चालवावी लागणार आहे. सर्व परिस्थितीतून मार्ग काढत सभासदाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.’

पद्माताई भोसले म्हणाल्या की,’ नवनिर्वाचित संचालक मंडळाने सभासद, कामगारांचे हित जपावे. आर्थिक अडचणी असताना देखील अगोदरचच्या संचालक मंडळाने जबाबदारीने सभासद हितासाठीचे कार्य केले आहे. कारखान्याच्या यशस्वीतेमध्येच सभासद शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार यांचे हित आहे.’
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,’ राज्यातील अनेक कारखाने सद्यपरिस्थितीत अडचणीत आहेत तसेच ते मार्गक्रमण करीत आहेत. कर्मयोगी साखर कारखान्याची ही निवडणूक 35 वर्षानंतर बिनविरोध होत असून या निमित्ताने आपण सर्व जण कारखान्याच्या हितासाठी एकत्रित आहोत.’
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, ॲड.कृष्णाजी यादव, मारुतीराव वणवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,निरा भिमा सह साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,माऊली चवरे, शकिल सय्यद यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केले.
सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार नगरसेवक कैलास कदम यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here