कर्जतचा कारभार आता रणरागिणींच्या हातात. 

कर्जत (प्रतिनिधी-गणेश खारतोडे): कर्जतमध्ये आज उषा राऊत यांची नगराध्यक्ष म्हणून आणि रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. या दोघींसह आमदार रोहित दादांना कर्जतकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या!_ कर्जतकरांनी मतदानरुपी दिलेल्या भरभरून प्रेमानंतर आज उषा राऊत यांची नगराध्यक्ष म्हणून तर रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी ग्रामदैवत सद्गुरु संतश्री गोदड महाराजांचा आशिर्वाद घेतला.
यासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य केलं, या सर्वांचे आभार! नगरपंचायतीचा कारभार रणरागिणींच्या हाती देता आला याचं समाधान आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा! या दोघी भगिनी कर्जतकरांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी काम करतील, असा विश्वास आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here