करमाळा / प्रतिनिधी – देवा कदम.
पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी करमाळा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर करमाळा पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेबांची समक्ष भेट घेऊन बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले व स्वागत पत्र देऊन गुंजवटे साहेब यांना सन्मानित करण्यात आले सदर पत्राच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गुंजवटे साहेब यांचे बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी अभिनंदन केले व करमाळा तालुक्यातील अवैद्य धंदे नियंत्रित ठेवून कायदा सुव्यवस्था आभादीत राखावा दारू पिऊन अहमदनगर टेंभुर्णी हयवे वरती आज पर्यंत शेकडो अपघात झाले आहेत त्यामुळे हयवे रोडवरील अवैद्य धंदे नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे पुढे एक महिन्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते त्यावेळेस अपघातांची संख्या वाढते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माननीय गुंजवटे साहेब यांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी राजाभाऊ कदम यांनी केली यावर पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी आमचे पोलीस या सर्व बाबतीमध्ये योग्य ती उपाययोजना करून कायदा सुव्यवस्था आभादीत ठेवण्याची व अपघात कमी होण्याची काळजी घेतील अशा पद्धतीची ग्वाही पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी दिली यावेळेस एपीआय कुंजीर साहेब उपस्थित होते.अध्यक्ष अंगद लांडगे, तालुका महासचिव आप्पा भोसले, प्रेम कुमार सरतापे, विजय भोसले, बापू भोसले, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Uncategorized करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेबांचा स्वागत पत्र देऊन बहुजन संघर्ष...