करमाळा तालुक्यातील या गावात पाणीपुरवठा योजना चालू न झाल्यास प्रहार संघटना करणार तीव्र आंदोलन.

करमाळा प्रतिनिधी -( देवा कदम)
करमाळा येथे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग करमाळा यांना मौजे भाळवणी गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजूर होऊन तीन-चार वर्ष झाले आहेत. काम सुरू होऊन देखील खूप दिवस झाले आहे.तरी अजूनही ते काम पूर्णत्वास नेले नाही व ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. ते काम करण्याची जबाबदारी शिवनेरी कंट्रक्शन कंपनी केम यांनी घेतली असून संबंधित ठेकेदाराने ते काम अजूनही पूर्णपणे व्यवस्थित केले नाही .तरी या ठेकेदारांना गावकऱ्यांनी कामा संदर्भात विचारले असता त्याला उलटसुलट उत्तर दिले आहे. याआधीही गावकऱ्यानी या कामाबाबत आपणाकडे तक्रारी केली होती. त्या कामाची दखल घेतली नाही. या गावांमध्ये पाण्याची अत्यंत टंचाई आहे गावातील पिण्यासाठी पाणी आजूबाजूच्या गावातून, इतरांच्या शेतातून आणत आहेत. ही अतिशय निंदनीय बाब आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून तसेच केलेल्या कामाची सरकारी इस्टिमेट नुसार तपासून योग्य प्रकारे केले आहे की नाही हे आपण आठ दिवसाच्या आत स्वतःहून जाऊन पाहणी करावी व लवकरात लवकर काम सुरू करावे,
अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष भाळवणी गावातील सर्व नागरिकांना घेऊन प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.असे निवेदन मुख्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद सोलापूर व गटविकास अधिकारी करमाळा यांना, देण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील तालुकाध्यक्ष संदीप तळेकर , समाज सेवक भाळवणी गावचे कृष्णा शिंदे, संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार सरचिटणीस प्रवीण मखरे तालुका संघटक नामदेव पालवे सर्व सैनिक उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here