करमाळा तालुक्यातील झरे या छोट्याशा गावांमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोल खंडू काळे या ध्येयवेड्या तरुणाने चित्रपटसृष्टी मध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. वडिलांना शेतातील कामाला मदत करून या तरुणाने चित्रपट नगरीमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून आज अमोल काळे यांनी स्मशानातील सोनं या लघुपटाचा ट्रेलर आज ak production या त्यांच्या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित केला आहे. हा लघुपट १ आॅगस्ट रोजी ak production चैनल वर येत आहे.तसेच मोठ्या पडद्यावरही हा चित्रपट लवकरच येत आहे…या लघुपटाला नुकताच मुंबई येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अमोल काळे यांना महाराष्ट्र गौरव सन्मान 2022 या पुरस्काराने गौरवण्यात आले व कलाकारांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये अमोल काळे व त्यांच्या सहकालाकारांचे विशेष कौतुक केले जात आहे .या लघुपटामध्ये स्वतः अमोल काळे, भारती कदम, हनुमंत निमगिरे, किरण कांबळे, सुहास गायकवाड, बाळासाहेब कानगुडे, बापू मोरे, वैशाली गायकवाड, विठ्ठल कुदळे, योगेश राऊत, अशोक जाधव, या सर्व कलाकारांनी भूमिका केल्या आहेत आणि कॅमेरामन म्हणून शुभम देडगे यांनी काम पाहिले आहे तर या लघुपटाला सुप्रसिद्ध एडिटर सिद्धार्थ चौधरी यांनी हा लघुपट एडिटिंग केला आहे .अमोल काळे यांनी प्रथमच बलुती नावाचा लघुपट करून चित्रपटसृष्टीत आपले नाव कोरले, बलुती लघुपटालाही ११ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे इतरही लघुपट बाप माणूस ,छबिन्या युट्युब वर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यांची याडपाट नावाची वेब सिरीजने शंभरी पार केली आहे. त्यांच्या वेब सिरीजचे आतापर्यंत 126 भाग झाले आहेत .आणि पुढेही ते चालू ठेवणार आहेत .अतिशय सुंदर अशी याडपाट वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे. एखाद्या वेब सिरीजच्या भागाचे शंभरी पार करणे सोपे काम नसते परंतु या ध्येयवेढ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने करून दाखवलेच, आणि चित्रपट सृष्टीत आपला दरारा निर्माण केला.या वेब सिरीज मधील कलाकार सुद्धा अतिशय सुंदर अभिनय करून सादरीकरण करत असतात आणि त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनाही मोठ्या पडद्यावरती म्हणजेच चित्रपट, मालिका ,यामध्ये अभिनयाची कामे मिळू लागली आहेत. अशा या ध्येयवेढ्या ग्रामीण भागातील तरुणाला व त्यांचा सहकालाकारांना जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Home Uncategorized करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामधील अमोल काळे यांची चित्रपट सृष्टीत दमदार एन्ट्री .