करमाळा प्रतिनिधी:सविता आंधळकर
करमाळा: महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे व तरुणांचे खरे प्रेरणास्थान “श्री छञपती शिवाजी राजे भोसले” यांची ३९२ वी जयंती सर्वत्र अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली तसेच करमाळा तालुक्यातील पांडे गावात देखील शिवजंयती अगदी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली . येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होत . स्पर्धेतून शिवरायांच्या विविध व्यक्तीमत्वाचे पैलु मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला . उपस्थित जनतेने “प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रिय कुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”… “हिंदवी स्वराज्य संस्थापक” “राजाधिराज योगिराज” “पुरंधराधिष्पती” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”…”श्री” “श्री” “श्री” “छत्रपती शिवाजी महाराज की जय”!!! जय भवानी जय शिवाजी !!!
यांसारख्या घोषणा देवून कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आणली. कार्यक्रमाला ॲड. नरुटे (करमाळा ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते . तसेच आप्पा भोसले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन छत्रपत्री शिवजी तरुण मंडळाने केले . तसेच कार्यक्रमाला माझी सैनिक उमाकांत आंधळकर, श्री कल्याण आप्पा दुधे , भागवत सर, पप्पु अनारसे , गोरख अनारसे, सुनिल भोसले, मारुती भोसले, पत्रकार दस्तगीर मुजावर व समस्त ग्रामस्थ यांचीही उपस्थिती मोलाची ठरली.