प्रतिनिधी: हनुमंत निमगिरे
जेऊर: जेऊर गावचे सुपुत्र असणारे आणि करमाळा तालुक्याचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस कोरोना चे सगळे नियम पाळून साजरा करण्यात आला. अतुल भाऊ वर प्रेम करणारे सर्व त्यांचे जवळचे मित्रमंडळी प्रतिष्ठित व्यक्ती वाढदिवसासाठी उपस्थित होते. अतुल भाऊ यांचा रांगडा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना फोनवरून व्हाट्सअप वरून भेटून अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ते डबल उप महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये त्यांना किताब मिळाला आहे. ते सर्वसामान्यांचे कामे कोणती जात पात, पक्ष न बघता करतात .गोरगरीब लोकांना मदत करतात. त्यांच्या हातून समाजासाठी खूप समाजसेवा होते .त्यामुळेच सामान्य लोकही त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत .पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा.