कर्जत प्रतिनिधी -:धनंजय खराडे
कर्जत तालुक्यातील करमणवाडी ,खेड,वायसेवाडी, गणेशवाडी,आखोणी, बारडगाव या परिसरात पशुमध्ये लम्पी स्किन आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा भाग लम्पी स्किन आजाराच्या विळख्यात सापडला आहे.ज्या पशुनां लम्पी झाला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत, काही बरे होत आहेत तर काही पशु रुग्णांना जास्त आजार झाल्याने आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पशुपालक पुर्ण चिंतेत पडला आहे.एकीकडे सतत येणाऱ्या पावसाने बऱ्याच ठिकाणची पिके गेली तर दुसरीकडे पशुंना आलेला लम्पी आजार या दुहेरी संकटात पशुपालक शेतकरी सापडला आहे.शासनाकडून पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.पशूला वेळेत उपचार करावा.त्यांना पशुवैद्यकीय मदत केली जाईल तसेच कोणीही चिंता करू नये असे आवाहन भांबोरा पशुवैद्यक उपविभागीय रूग्णालयाचे डॉ.बालछत्रे यांच्याकडून पशुपालकांना करण्यात येत आहे.