ओळख परेड: आमदार भरणे मामांनी ही मोजल्या 18 ग्रामपंचायती. भरगच्च कार्यक्रमात मामांनी घेतली हजेरी.वाचा सविस्तर.

इंदापू (प्रतिनिधी: मायादेवी मिसाळ) इंदापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून राजकीय वातावरण दाखले पाहायला मिळाले त्याचे कारण म्हणजे इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतची निवडणूकीची रणधुमाळी. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाचा फॉर्म भरल्यापासून फॉर्म काढण्याची मुदत संपेपर्यंत आणि त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी ही खूप हाय व्होल्टेज प्रमाणे होती यात शंका नाही. त्यातच गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाने 19 ग्रामपंचायतवर दावा केल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिष्ठापनाला लागली होती. काल भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्य लोकांची ओळख परेड घेण्यात आली.इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १२ ठिकाणी निवडून आलेले सरपंच व ६ ठिकाणी राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या सदस्यांची ओळख परेड भरणेवाडी ता.इंदापूर येथे रविवार दि.२५ रोजी करत माजीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीचे १८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवले.यावेळी बोलताना माजीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,येथील विरोधकांनी १९ ग्रामपंचायतींवर केलेला दावा खोटा असून तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १२ गावचे नूतन सरपंच उपस्थित असून सर्वच्या सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित आहेत.असे असतानाही चुकीचा गैरसमज पसरवून स्वतःची पोळी भाजण्याचा विरोधकांचा स्वभाव जात नाही हे दुर्दैव.यावेळी
कळाशी नूतन सरपंच रुपाली गलांडे
कुरवली सरपंच राहुल चव्हाण
म्हासोबाचीवाडी सरपंच राजेंद्र राऊत
डिकसळ सरपंच मनीषा गवळी
रणगाव सरपंच योगेश खरात
न्हावी सरपंच आशा डोंबाळे
झगडेवाडी सरपंच अतुल झगडे
बोरी सरपंच मंदा ठोंबरे
जांब सरपंच समाधान गायकवाड
लाखेवाडी सरपंच चित्रलेखा ढोले
माळवाडी सरपंच मंगल व्यवहारे
हे सर्व सरपंच उपस्थित होते. मदनवाडीच्या अश्विनी बंडगर या सुद्धा राष्ट्रवादीच्याच सरपंच आहेत पण काही  कारणाने त्या उपस्थित नाहीत असे भरणेमामा म्हणाले. डाळज नं ३ चे ७ पैकी ५ सदस्य, हिंगणगावचे ७ पैकी ५ सदस्य, अजोती (सुगाव) येथील ७ पैकी ५ सदस्य,पिंपरी (शिरसोडी) येथील ११ पैकी ११ सदस्य, डाळज नं २ येथील ७ पैकी ५ सदस्य तर बेलवाडी येथील १३ पैकी ७ सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,प्रतापराव पाटील,सचिन सपकळ,हनुमंत कोकाटे, आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here