ओबीसी समाजाला आरक्षण मिळणे कामी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश मिळाले- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.

महाराष्ट्रात ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळावा यासाठी 27 टक्के आरक्षण मंजूर करण्यामध्ये शासनापर्यंत इंदापूर तालुक्यातील ओबीसी समाजाची बाजू मांडण्यासाठी अहोरात्र काम करणारे राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने सत्कार व आभार मानण्यात आले.
यावेळी ओबीसी समाजाचे नेते पांडुरंग तात्या शिंदे म्हणाले की,”ओबीसी समाजाला न्याय हक्कासाठी आरक्षण मंजूर व्हावे म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ओबीसी समाजाचे वेळोवेळी गाऱ्हाणे शासन दरबारी मांडले व ओबीसी समाजास आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल आम्ही इंदापूर शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने सत्कार करणे हे आमचे कर्तव्य समजून आमचे मार्गदर्शक हर्षवर्धन पाटील यांचा आम्ही सत्कार केला असे ओबीसी समाजाचे नेते पांडुरंग तात्या शिंदे यांनी यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,”महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मी समजतो.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यापुढेही ओबीसी समाजाच्या अडचणी ठामपणे सोडवतील असा माझा विश्वास आहे”असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने पांडुरंग तात्या शिंदे, राजकुमार राऊत,देवराज जाधव,अमोल राऊत,पांडुरंग(बंडु)शिंदे, पोपट पवार, शब्बीर बेपारी, नरेंद्र शिंदे सागर गानबोटे, संतोष शिंदे,रियाज बेपारी, आयुब बेपारी, संतोष राऊत, बाबा राऊत राजू साळुंखे,मुन्ना बागवान,अमित जौंजाळ, सचिन जामदार,धीरज शहा, महेश ढगे, श्री पटेल,संदीप चव्हाण, संतोष देवकर, आस्वाद जौंजाळ,अमोल जाधव, अभय शिंदे ,अजिनाथ शिंदे, शिवराज शिंदे, इत्यादी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here