ओबीसी आक्रोश मोर्चासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न…

वैभव पाटील :प्रतिनिधी
ओबीसी आक्रोश मोर्चासाठी सफाळे पंचक्रोशीतील सर्वपक्षीय बैठक अभिनव विद्यालय विराथन येथे पार पडली . या बैठकीत 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात लाखोंचा जनसमुदाय एकवटण्यासाठी सर्वां आवाहन करण्यात आले.
राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पालघर जिल्हातील ओबीसी ची लोकसंख्या शुन्य टक्के दाखवली आहे. त्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. उद्या नोकरीमधील व शैक्षणिक आरक्षण पण संपुष्टात येऊ शकते. नवनिर्वाचित पालघर मध्ये सुमारे 9200 पदे सरकारी कार्यालयामध्ये रिक्त आहेत. ती भरणे गरजेचे आहे. त्याकरिता फार मोठे आंदोलन उभे करावे लागेल. पालघरमधील सर्वपक्षीय नेते व स्थानिक जनता एकत्र आले आहेत. पालघरमध्ये त्याकरिता विविध ठिकाणी सभा घेण्यात येत आहात.
त्याअनुषंगाने विठ्ठलवाडी ते टेंभी खोडावे विभागातील कार्यकर्त्यांची सभा मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी अभिनव विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी 6 वाजता आयोजित आली होती .सदर सभेत जिल्हाध्यक्ष ओबीसी राजीव पाटील माजी बांधकाम सभापती दामोदर पाटील,माजी आरोग्य सभापती सुरेश तरे ,आगरी सेना कार्याध्यक्ष चंदूलाल घरत, केतन (काका )पाटील विलास चोरघे, पि.टी. पाटील, अनुप पाटील,मंगेश घरत ,कल्पेश पाटील , जयेश पाटील आदींनी मोर्चासंबधी मार्गदर्शन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here