इंदापूर : दीपावलीच्या निमित्ताने उद्धट येथील युवकांनी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कलाकृतींचा अविष्कार किल्ल्याच्या रूपाने साकारलेल्या होता. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी उद्धट येथे जावून युवकांनी साकारलेल्या ऐतिहासिक कल्पकतेचे भरभरून कौतुक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन वाटचाल करण्याचे युवकांना त्यांनी आवाहन केले.
उद्धट येथील श्रीनिवास संतोष काळे व त्यांचे सहकारी स्वामी जगदीश कुंभार,शुभम संजय पवार,मयूर शिवाजी कारभोळ,अमोल अनिल कणसे यांनी किल्ले पन्हाळा – पावनखिंड – विशालगड किल्ला साकारला. राजवर्धन पाटील यांनी या युवकाकडून किल्ल्याविषयी ची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले.