पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिनातून जनजागृती संपन्न.

पळसदेव (ता. इंदापूर): येथील एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये सोमवार (दि.16) वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यालयातील मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.नवरसावरती आधारित नाटिका व गीतामधून पालक व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.एकूण 500 विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभाग घेतला तर 3000 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.यावेळी मा. गुलाब तुपे (उद्योजक), मा. डॉ. किरण शहा (अध्यक्ष वेल्फेअर मेडिकल फाउंडेशन), मा.राधा खुडे (सुप्रसिद्ध गायिका),मा.अमृता भोईटे (निर्भया पथक) ,मा.किरण शहा (उद्योजक पळसदेव) मा.प्रदीप काळे (मा.सदस्य पंचायत समिती इंदापूर),मा.साै.इंद्रायणीताई मोरे (सरपंच), मा.कैलास भोसले (उपसरपंच), चंद्रकांत साेळसे (प्राचार्य- नंदिकेश्वर विद्यालय), जगन्नाथ पाटील (प्राचार्य-बाबीर विद्यालय रुई),सर्व पत्रकार, श्री हनुमंत बनसुडे(अध्यक्ष), डॉ.शितल कुमार शहा(उपाध्यक्ष), साै.नंदाताई बनसुडे (कार्याध्यक्षा), श्री .नितीन बनसुडे (सचिव) ,श्री संतोष काळे, श्री विठ्ठल बनसुडे, श्री अंकुश बनसुडे ,श्री हनुमंत(आप्पा) मोरे सौ कणके ताई ,सौ अर्चना बनसुडे, सौ कोमल बनसुडे, साै.वंदना बनसुडे (प्राचार्या),श्री राहुल वायसे (मुख्याध्यापक), श्री प्रकाश दरदरे (समन्वयक), सर्व विश्वस्त मंडळ गीता शिक्षण प्रसारक मंडळ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण मदने व आभार साै.तेजस्विनी तनपुरे यांनी मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here