इंदापूर: निमसाखर एज्यु.सोसायटीचे एन.ई.एस.हाय.व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता.इंदापूर या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यावेळी संस्थाअध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमसाखर गावचे प्रथम नागरिक धैर्यशील विजयसिंह रणवरे हे उपस्थित होते.यावेळी संस्थाअध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की,भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये अनेक महान, त्यागी देशभक्ताचा सहभाग होता.अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते.प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल अभिमान असलाच पाहिजे.आजचा कोरोनाचा काळ अत्यंत भयावह आहे.आज अनेक क्षेत्रामध्ये फार मोठे नुकसान झालेले आहे.उत्तम दर्जाचे शिक्षण व योग्य प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांना मिळाले तर नक्कीच राष्ट्राची प्रगती होण्यास मदत होते.असेही मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी ही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थाउपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे माजी सरपंच जयश्रीताई अडसूळ, निमसाखर विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य भगवान रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, शेखर पानसरे, सुदाम भोसले.तसेच दिलीप माने, ग्रामसेवक सुधाकर भिलारे व तलाठी महादेव खारतोडे तसेच ग्रामस्थ, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी सर्वांचे आभार मानले.