एक नंबर बिलिंदर वेब सिरीज मधून अव्वल दर्जा मनोरंजन व समाजप्रबोधन.

प्रतिनिधी :महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे. (ता.दौंड) येथील ओम श्री साई फिल्म प्रॉडक्शनचे सुनील मोरे व सहकारी ‘एक नंबर बिलिंदर’ या वेबसिरीज मध्ये अस्सल गावरान मराठी भाषेत समाजप्रबोधन, मनोरंजन, सामाजिक उपक्रमाची माहिती प्रत्येक एपिसोड करत आहेत.अनेकदा गावाकडच्या कलाकारांनाच वाव मिळत नाही परंतु ‘एक नंबर बिलिंदर’ या वेबसिरीजमध्ये सर्व नवोदित संधी देण्यात आली आहे व 22 एपिसोड शूट करून लवकरच त्याचा नवीन सीजन येत आहे.
एक नंबर बिलिंदर वेबसिरीजचे निर्माता सुनिल मोरे, सहनिर्माता सुभाष गदादे, लेखक व दिग्दर्शक सुनील नेटके, व कलाकार म्हणून काम करत असलेले जिजाबा बर्डे, गणेश जगताप, सोहेल सय्यद, जबीन पठाण, नागेश पाटोळे, माऊली अडसूळ, राया कांचन, वैभव इंदलकर अमृता दनाने, वृषाली शिंदे, श्रावणी जगदाळे, अमित खोमणे भरत भुजबळ, प्रवीण वाघमोरे, प्रशांत पवार, विजय ओहोळ, यांनी आज भेट घेतली.
तीस जणांची टीम यासाठी काम करत होते. युट्युबवर आपण एक नंबर बिलिंदर असं सर्च केलं असता आपल्याला याचे एपिसोड पाहता येतील. देऊळगाव राजे आणि सिद्धटेक येथे ड्रोन कॅमेरा वापर करून शूटिंग केलं आहे. एडिटिंगसाठी लखन वाणी यांनी सहाय्य केले आहे.
तसेच या ग्रुपमध्ये असणारे आबा यांचा ‘आबांची भटकंती’ म्हणून युट्युबवर एक ब्लॉग आहे. यावर 75 वर्षाचे आबा विविध गडांवर भेट देतात. यामध्ये किल्ले तोरणा, राजगड, शिवनेरी, रायरेश्वर, किंजळगड, अजिंक्यतारा या गडांना त्यांनी 75 व्या वर्षीही भेट दिली आहे.आपल्या स्थानिक कलाकारांनी बनवलेली एक नंबर बिलिंदर ही मराठी भाषेशी मराठी मातीशी जोडलेली वेब सिरीज आपण सर्वजण नक्की पहा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here