प्रतिनिधी: अक्षय खरात
यंदाचे पावसाळी अधिवेशन हे राजकीय आखाडा बनला होता,अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये इतका गोंधळ झालेला पहावयास मिळाला आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राज्यातील सत्तांतरावरून प्रचंड रनकंदन चालू होते.दोन्ही बाजूकडील आमदार अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. अधिवेशनाचा संपूर्ण काळ गोंधळामध्येच गेला असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत असताना इंदापूर तालुक्यासाठी मात्र नेहमीप्रमाणे विकास निधीसाठी प्रयत्न चालू होता.
होय….. माजी राज्यमंत्री तसेच इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे एवढ्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणातून आपल्या इंदापूर तालुक्याच्या विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सगळ्यांना दिसले.
श्री.भरणे हे एक सभ्य व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात,राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणावर ज्यादा भर असतो. ते कधीही चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात स्वतःला आणत नाहीत,मात्र आपापल्या मतदारसंघांमध्ये विकास निधी खेचून आणण्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये दत्तात्रय भरणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते कारण कोणत्याही वाद विवादामध्ये न पडता ते विकासाभिमुख राजकारणासाठी प्रामुख्याने प्रयत्न करत असतात त्यामुळेच इतर सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जात असताना श्री भरणे यांनी मात्र अधिवेशनाच्या काळात इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची गळ प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन घातली.आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निधीची मागणी केली.
त्यातच दत्तात्रय भरणे यांचा स्वभाव असा आहे की,कोणीही मंत्री असू देत, ते श्री.भरणे यांना नक्कीच मदत करतात हा त्यांचा विलक्षण अनुभव तालुकावासियांना नेहमीच आलेला आहे.त्यामुळे जरी अधिवेशनाच्या काळामध्ये सत्ताधारी-विरोधक यांच्यात गोंधळ उडालेला असला तरी इंदापूर तालुक्यासाठी मात्र निधीची ओंजळ दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने नक्की भरेल हा विश्वास आहे.