एकरी 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबाबत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत सरडेवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत 25 जून 2022 ते 1 जुलै 2022 या कालावधीमध्ये ‘कृषि संजीवनी मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत इंदापूर तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज दिनांक 27/06/2022 रोजी मंडळ कृषी अधिकारी, इंदापूर श्री. बाळासाहेब कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सरडेवाडी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये कृषि पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब यादव यांनी शेतकऱ्यांना एकरी 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.यामध्ये जमिनीचा कर्ब वाढविण्यासाठी पाचट व्यवस्थापन, जमिनीची पूर्वमशागत, ताग व धेंचा लागवड, सुपर केन नर्सरी, बेणेप्रक्रिया, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी पर्यवेक्षक श्री. विलास बोराटे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.श्री.हनुमंत बोडके,कृषी सहाय्यक यांनी बेणे निवड, बेणे बदल व बेणे मळा व्यवस्थापन तसेच हुमणी व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरडेवाडी चे सरपंच श्री. सिताराम जानकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरडेवाडी सोसायटीचे चेअरमन श्री. प्रविण सरडे, प्रगतशील बागायतदार श्री. संजय चित्राव यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित राहिले.कृषि सहाय्यक श्री. भारत बोंगाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here