एकरी 100 टन उत्पादन निघण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिले धडे,खोडवा आणि पाचट व्यवस्थापन विषयीसुद्धा केले मोलाचे मार्गदर्शन.

👉 खोडवा ऊसाची पाचट जाळू नका ! पाचट एका आड एक सरीत ठेवा !! पाचट कुजवा, जमीनची सुपीकता वाढवा असा दिला कानमंत्र.
👉 पाचटमुळे पाण्याची बचत, विजबिलात बचत, तणनियंत्रण, सुपिकता वाढ,उत्पादनात वाढ, प्रदुषणात घट.
👉 पंचक्रोशीतील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय.
बिजवडी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 30 डिसेंबर रोजी लीलावती सांस्कृतिक भवन बिजवडी येथे एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियान व खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संचालक शिंगाडे,कारखान्याचे कार्यकारी संचालक लोकरे, माजी संचालक मच्छिंद्र अभंग यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी विभाग कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे कृषी परिवेक्षक बाळासाहेब यादव, विलास बोराटे व कृषी विभाग कर्मचारी व प्रगतशील शेतकरी श्री विजयसिंह बालगुडे श्री पांडुरंग मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी 100 टन ऊस उत्पादन व पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.यावेळी खोडवा ऊसाची पाचट जाळू नका ! पाचट एका आड एक सरीत ठेवा !! पाचट कुजवा, जमीनची सुपीकता वाढवा असा कानमंत्र दिला व पाचटमुळे पाण्याची बचत, विजबिलात बचत, तणनियंत्रण, सुपिकता वाढ,उत्पादनात वाढ, प्रदुषणात घट असे फायदेही विस्तृत स्वरूपात सांगण्यात आले.तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवरसो यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.श्री विजयसिंह बालगुडे व मदने यांनी एकरी शंभर टना पेक्षा अधिक उत्पादन कसे घेतले याविषयी अनुभव सांगितला.श्री बाळासाहेब कोकणे यांनी एकरी शंभर टन उत्पादन येणे विषयी पंचसूत्री कार्यक्रमाविषयी माहिती दिली.आभार प्रदर्शन श्री बाळासाहेब यादव यांनी केले यावेळी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here