उद्या बिजवडी येथे एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान व पाचट व्यवस्थापन यावर मार्गदर्शक शिबिर.

👉 एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम.
👉 एक ते 100 टना पेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी विजयकुमार बालगुडे व पांडुरंग मदने यांचे मनोगत.
बिजवडी: इंदापूर तालुक्यात ऊसाची सरासरी उत्पादकता साधारण एकरी ४५-५० टन इतकी आहे. ऊसाचे प्रति एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणेसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लिलावती सांस्कृतिक भवन बिजवडी येथे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केली असून या कार्यक्रमात 100 टन ऊस उत्पादन मार्गदर्शक अभियान होणार आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढण्याकरीता मदत होईल व पाचट व्यवस्थापन यामध्ये पाचटाचे महत्त्व व त्याचे फायदे यावर विस्तृत स्वरूपाचे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी बारामती श्री वैभवजी तांबे करणार आहेत.इंदापूर तालुक्यातील उत्पादक शेतकरी व इतर उत्पन्न घेणारे शेतकरी यांना कृषी विभागाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी विविध योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर देणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु! येथील प्रगतशील शेतकरी विजयकुमार बालगुडे व भावडी गावचे शेतकरी पांडुरंग मदने यांनी एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन काढले आहे या दोन्ही शेतकऱ्यांचे मनोगत या कार्यशाळेमध्ये ठेवण्यात आले असल्याने याचाही फायदाही शेतकऱ्यांना होईल.इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महत्त्वपूर्ण कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here