महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण , श्री. विकास पाटील यांनी वरकुटे बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी श्री. विजयसिंह नागनाथ बालगुडे यांच्या ऊस रोपवाटिकेस भेट दिली . या प्रसंगी मा. संचालक साहेब यांनी उपस्थित शेतकरी बंधूंना सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर , माती परीक्षणानुसार एकात्मिक खत नियोजन, एकात्मिक पाणी नियोजन व ठिबक सिंचन चा वापर तसेच खोडवा ऊस पाचट नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मा. रफिक नाईकवाडी साहेब, विभागीय कृषि सहसंचालक, पुणे यांनी एक डोळा ऊस लागवड पद्धत व त्याचे फायदे , ऊस बेणे प्रक्रिया , एकात्मिक किड नियोजन व तण नियंत्रण ,याबाबत उपस्थित शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केले. वैभव तांबे साहेब उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती यांनी पायाभूत बेणे निवड, बेणे प्रक्रिया, ऊस आंतरपीक पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रक्षेत्र भेटीच्या वेळी इंदापूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रुपनवर, मंडळ कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब कोकणे, कृषी पर्यवेक्षक श्री. विलास बोराटे व बाळासाहेब यादव व कृषि विभागाचे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.