उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अॅक्शन मोडमध्ये आले. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला.आज संबंधित बैठक ही ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावं, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय.
देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात दाखल झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात कोरोना प्रतिबंधक म्हणून काचेचे बॅरिकेट्स लावले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते बॅरिकेट्स आधी अधिकाऱ्यांना काढायला सांगितले. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी ओबीसी आरक्षणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला. तसेच ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू व्हावं यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करा, असं फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू व्हावं यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करा, असं फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.
Home ताज्या-घडामोडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अॅक्शन मोडमध्ये:-हाती घेतला...