मराठा समाजास आरक्षण मिळावे या कामी इंदापूर तालुक्यातील मराठी बांधव ठरलेल्या वेळापत्रकानुसार रोजच्या रोज गेल्या दोन महिने साखळी उपोषण करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन जो लढा उभा केलाय त्या लढ्यास पाठिंबा देत इंदापूर तालुक्यातील मराठा बांधव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहेत.उद्या 24 डिसेंबरला या साखळी उपोषणाची सांगता होण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर यानंतरच्या आंदोलनाची काय दिशा असेल हेही उद्याच ठरणार आहे आणि याच निमित्त समाजात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम उद्या म्हणजेच 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित केला आहे. गेल्याच महिन्यात मराठा समाजाच्या वतीने सहा दिवस रोहित पाटील, मेजर महादेव सोमवंशी, आश्रम फरतडे यांनी अमरण उपोषणाचे अस्त्र निवडत शासनाचे लक्ष वेधले होते व त्यानंतर स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार हे अमरण उपोषण स्थगित झाले होते. उद्या पोवाडा व पुढील दिशा आंदोलन स्थळीत होणार आहे म्हणजेच 100 फुटी रोड वर जो सकल गरजवंत मराठ्यांचा लढा उभा आहे त्याच ठिकाणीच हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वच बांधवांनी यामध्ये उपस्थित राहून पोवाड्याचा कार्यक्रम व आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज इंदापूर तालुका यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Home Uncategorized उद्या 24 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषण स्थळी होणार लोकप्रिय शिवशाहीर...