महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता याचे परिणाम तळागाळापर्यंत पोहोचू लागल्याचे दिसत आहेत. आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व इंदापुरातील पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्याचे फोटो व्हायरल होत आहे.यातूनच आता इंदापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार व शपथविधी घेतलेल्या आमदार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंड थोपटलेले दिसत आहेत तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षांसह अजितदादांना भेटल्याने इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी हे अजितदादांच्या सोबत तर नाहीत ना अशी चर्चा वायरल होणाऱ्या फोटोवरून चालू आहे.आज रात्री इंदापूर मधील एका ज्येष्ठ पत्रकाराने जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना संपर्क केला असता “आज आम्ही खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही भेटलो आहे,आम्ही उद्या पुणे येथे सर्व तालुकाध्यक्षांची बैठक लावून त्यांचा कौल जाणून घेऊन एक ठोस निर्णय घेणार आहोत”असे सांगण्यात आले. त्यामुळे उद्याच्या बैठकीवर जिल्ह्याची अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असतील यात शंका नाही.
Home Uncategorized उद्या ठरणार पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी पुणे जिल्हा दादांसोबत की पवार...