गुरुवार दिनांक 16 जून 2022 रोजी कासुर्डी ता. दौंड येथील ह.भ.प. दत्तात्रय महाराज सोळसकर ( अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र / अध्यक्ष भुलेश्वर प्रासादिक दिंडी क्रमांक 45 कासुर्डी ) यांच्या मातोश्रींचे कै.श्रीमती फुलाबाई शंकर सोळसकर यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त झी टॉकीज फेम ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे. व त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन केले आहे.सध्या सोशल मीडिया युट्युब तसेच झी टॉकीज च्या माध्यमातून पुरुषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तने राज्यभर गाजत आहेत.पहिल्यांदाच यवत विभागामध्ये या महाराजांचे कीर्तन होत आहे.दौंड परिसरातील सर्व भाविकांनी या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोळसकर परिवाराकडून करण्यात आले आहे.