दत्तात्रय भरणे व मा.आ. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील एकाच मंचावर:- पत्रकार दिनानिमित्त इंदापूर येथे रंगणार पत्रकार दिन सोहळा.

👉 तालुक्यातील विकासाचे भागीदार ठरणार पुरस्काराचे मानकरी
👉 महिला सफाई कामगारांचा पैठणी देऊन सन्मान
इंदापूर(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने,(ता.६ जानेवारी)रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर शहरातील डॉ.नीतू मांडके आय. एम.ए.हाऊस सभागृह येथे,राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे,राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार दिन सोहळा होणार असून, यामध्ये तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान,तसेच महिला सफाई कामगारांना पैठणी देऊन सन्मान व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती, पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व तालुका कार्याध्यक्ष जावेद मुलाणी तसेच मुख्य सचिव सागर शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये आजी-माजी आमदार हे एकाच व्यासपीठावर येत असल्याने परवा ते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.पत्रकार दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील विकासाचे भागीदार म्हणून, अनिकेत भरणे(आदर्श सामाजिक कार्य),अंगद शहा(युवा उद्योजक व प्रगतशील शेतकरी), धनंजय वैद्य(आदर्श अभियंता),राजेंद्रबापु जगताप(आदर्श बांधकाम व्यवसायिक), बाळासाहेब हरणावळ(आदर्श शिक्षण संस्था चालक),डॉ.एकनाथ चंदनशिवे (आदर्श वैद्यकीय सेवा),शिवकुमार कुपल(उत्कृष्ट अभियंता) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.तर इंदापूर शहर व ग्रामीण भागातील महिला सफाई कामगारांना मोफत पैठणी देऊन सन्मानित करण्यात येईल.तसेच तालुक्यातील पत्रकार बांधवांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने,इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीणभैय्या माने,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार,रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी,तसेच तालुक्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी,सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या पत्रकार दिन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here