उद्यापासून निमगाव केतकीत तीन दिवस भव्य गणेश यात्रा. यात्रेत मिरवणूक,जंगी कुस्त्यासह गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रासुध्दा.

👉 निमगाव केतकीत उद्यापासून भव्य गणेश यात्रा.
सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट व श्री सुवर्णयुगेश्वर पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव केतकी येथे उद्यापासून भव्य गणेश यात्रेला प्रारंभ होणार आहे. निमगाव केतकीकरांचा सुवर्णयुग गणेश बाप्पावर प्रचंड भक्ती आहे. निमगाव केतकीत सुवर्णयुग गणेश हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचे मंदिर आहे. याच सुवर्णयुग गणेशाच्या यात्रेचा उद्या म्हणजेच रविवारी मिरवणूक काढून शोभायात्रा दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान होणार आहे.
सोमवारी यज्ञ आणि आरती 12 वाजेपर्यंत चालेल व त्यानंतर एक वाचता निकाली कुस्तीचे जंगी मैदान गाजणार आहे.मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी मनोरंजनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलावंत गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा होणार आहे.तरी तीन दिवस चालणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णयुग गणेश ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, उपाध्यक्ष भारत मोरे, सचिव किशोर पवार, खजिनदार भगवान घाडगे, विश्वस्त सूर्यकांत महामुनी, दशरथ बनकर,वसंत घाडगे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here