उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह ‘मशाल’; शिंदे गटाला सध्यातरी चिन्ह नाही.

उद्धव ठाकरेयांच्या गटाला आता नवं नाव आणि नवं चिन्ह मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे.तर मशाल हे चिन्ह त्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं आव्हान असणार आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांनी दिलेल्या चिन्हांच्या तीन पर्यायांपैकी एकही चिन्ह त्यांना देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांना आता तीन नवे पर्याय देण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
👉 उद्धव ठाकरे गटाला मशालच का?
उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले होते. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश होता. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने हे कुणालाही देता येणार नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील एका पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. या आधी मशाल हे चिन्ह एका राजकीय पक्षाला देण्यात आलं होतं. पण त्या पक्षाला अपेक्षित मतं राखता आली नाहीत. त्यामुळे या चिन्हावरचं आरक्षण काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here