उजनी बॅकवाटर परिसर विकासकामांनी न्हाऊन निघणार.. दत्तात्रय भरणे प्रयत्नातून 8.14 कोटी मंजूर

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून उजनी बॅकवाटर परिसरातील अनेक ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी भरघोस निधी मंजुर झाला आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतींचा विकासाच्या बाबतीतील अनुशेष ब-याच अंशी भरून निघणार आहे.या निमित्ताने चालु अर्थिक वर्षामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा विकासकामांची दमदार सुरवात केली आहे.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अतिशय मेहनती लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात परिचीत आहेत.त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत अतिशय सलोख्याचे संबध असल्यामुळे विकासकामांसाठी सत्ता असो किंवा नसो आमदार भरणे यांना निधीची असलीही कमतरता भासत नाही.त्यामुळेच ते विकासकामे मंजूर करून आणण्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या विषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपल्या राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उजनी बॅकवाटर परिसरातील विविध गावामध्ये प्रलंबित विकासकामांसाठी आपण पुनर्वसन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे प्रस्ताव सादर करून त्याचा नियमीत पाठपुरावा केला होता.परंतु दरम्यानच्या काळात राज्यातील सत्ताबदल झाल्यामुळे प्रस्तावित विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती.परंतु चालू अर्थिक वर्षामध्ये पुनर्वसन विभागाचा तब्बल 8 कोटीपेक्षा जास्त निधी खेचून आणण्यात यशस्वी झाल्याचे भरणे यांनी सांगितले.तसेच या विभागाच्या माध्यमातून उर्वरित गावांनाही लवकरच निधी मंजूर होणार असल्याचे शेवटी ते म्हणाले.
👉खालील गावांना मंजूर झालेला निधी
1.तरटगाव – कुबेर भांगे ते हनुमान मंदिर पोहोच रस्ता-16.91 लक्ष
2.अगोती नं.1 – अंतर्गत उर्वरित रस्ते करणे – 56.34 लक्ष,स्मशानभूमी शेड साठी पोहोच रस्ता करणे-33.88 लक्ष,शाळा संरक्षक भिंत बांधकाम करणे-25.49 लक्ष
3.पडस्थळ-स्मशानभुमी शेड साठी पोहोच रस्ता तयार करणे-34.07
लक्ष,अंतर्गत उर्वरित रस्ते बांधकाम करणे-27.17 लक्ष
4.पिंपरी खु-प्राथमिक शाळा ते स्मशानभूमी शेठ साठी रस्ता तयार करणे-33.86लक्ष
5.आजोती-स्मशानभुमी शेड सिठी पोहोचसाठी रस्ता तयार करणे-33.93लक्ष,अंतर्गत उर्वरीत रस्ते बांधकाम करणे-56.89 लक्ष
6.शहा-स्मशानभुमी शेड साठी पोहोच रस्ता तयार करणे-33.72 लक्ष,प्राथमिक शाळा संरक्षक भिंत बांधकाम करणे-24.77 लक्ष
7.कालठण नं 1-स्मशानभुमी पोहोच रस्ता करणे-66.72लक्ष,स्मशानभुमी शेडसाठी पोहोच रस्ता करणे-66.72 लक्ष
8.माळवाडी नं.2- गावठाण ते स्मशानभूमी शेड पोहोच रस्ता तयार करणे-34.62 लक्ष
9.डाळज नं.3-अंतर्गत उर्वरित रस्ते बांधकाम करणे-57.04 लक्ष
10.कांदलगाव-अंतर्गत उर्वरित रस्ते बांधकाम करणे(शेख वस्ती ते मस्जिद दर्गा)-33.93 लक्ष,सोनवणे वस्ती ते स्मशानभूमी शेड रस्ता करणे-33.93 लक्ष
11.माळवाडी नं.1-अंतर्गत उर्वरित रस्ते बांधकाम करणे-58.24 लक्ष

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here