दौंड प्रतिनिधी:अजय तोडकर
दौंड:उजनी जलाशयामध्ये गेल्या काही वर्षापासून विविध जातीचे मासे असल्याच्या घटना आपण यापूर्वी वाचलेले आहेत.त्याचप्रमाणे काही भागातील लोकांना मगर/सुसर अशा प्रकारचे हिंसक प्राणीही आढळून आल्याचे आपण ऐकला आहे.परंतु दौंड तालुक्यातील उजनी जलाशयाच्या फुगवटय़ाजवळील सोनवडी गावाजवळ मच्छीमाराला “रेड ईअर स्लाईडर” जातीचे अमेरिकन कासव सापडले आहे. हे कासव वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सध्या हे कासव पंचक्रोशीतील लोकांना कुतूहलाचा विषय बनला आहे. अतिशय रंगतदार आणि सुबक मूर्ती सारखे दिसणारे हे कासव दिसताक्षणी नजरेत भरणारे असे आहे.
उजनी जलाशयाच्या फुगवटय़ाजवळील सोनवडी-जिरेगाव परिसरात राजेंद्र केवटे व विशाल मल्लाव हे दोघे मासेमारी करीत असताना त्यांच्या जाळ्यात एक वेगळ्या प्रकारचे कासव अडकले.