उजनीच्या काठावर चालू एसटीत ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, सुधीरने धावत जाऊन स्टिअरिंग संभाळली,वाचा 40 जणांच्या सुटकेचा भयानक थरार..

इंदापूर: संकट काळ कधी व कसा येईल हे सांगता येत नाही आणि त्या संकटकाळात प्रसंगावधान राखत जो स्वतःचा वाचवून इतरांचाही जीव वाचवतो तोच खरा हिरो असं म्हणता येईल.असाच एक रियल लाईफ मधला खराखुरा हिरो ज्या हिरोने स्वतःच्या तर जीव वाचवलाच पण तब्बल 40 जणांना जलसमाधीपासून वाचवले… मित्रांनो ही कुठली चित्रपटातील स्टोरी नाही बर का..! ही आहे खरोखर घडलेली घटना ती इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील भीमा नदीच्या तीरावरील पुलावरची..अगदी पिक्चरला साजेशी अशीच घटना जी काल साधारण संध्याकाळी अकराच्या दरम्यान चालू एसटीमध्ये घडली.काळ आला पण वेळ नाही, या म्हणीचा अर्थ उदगीर-पुणे बसमधील 40 प्रवाशांना आला आहे. कारण एका तरुणाच्या प्रसंगावधनामुळे एसटी बस उजनी धरनात जलसमाधी घेण्यापासून वाचली आहे.
या बसमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांचा जीव त्या तरुणामुळे वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशाने 40 प्रवाशांचे प्राण वाचवले .
सोलापूर पुणे महामार्गावरून धावत असलेली बस वेळ रात्रीच्या साडे दहा ते अकराची, प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला अन् बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवाशांनी पाहिले तर बस चालकाने मान टाकलेली. त्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली. याचवेळी एका युवकाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेऊन ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करीत हँडब्रेकवर बस थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत …
उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) मधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून पळसदेव गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे ते बस चालू असताना स्टिअरिंगवरच कोसळले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली.. त्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं. पण त्याचवेळी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधन राखत स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. 40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले.
सुदैवाने वेळीच बस नियंत्रणात आली अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती. प्रवाशी सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात चालक गोविद सूर्यवंशी शुद्धीवर आले आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याने सुधिर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठले . सूर्यवंशी याना वेळीच हॉस्पिटल मध्ये आणल्याने त्यांचेवर उपचार सुरु होऊ शकले.
सुधीरमुळे जीव वाचल्याने सर्व प्रवाशांनी त्याचे आभार मानले आणि साहजिकच आहे कारण पंढरपूर नजीक असलेल्या करकंब या गावातील हा सुधीर त्यांच्यासाठी साक्षात विठ्ठल होऊनच जीव वाचवायला आला होता असं म्हणता येईल.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here