कु. अदिती चाकणे जपानमधील जगप्रसिद्ध टोकुशिमा विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी निवड झाली असून, जपान येथील पीएचडी प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून तिने पूर्ण केली असून सर्व परीक्षा पास होऊन तिची निवड झाली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये अदिती जपानला जाणार आहे त्या प्रित्यर्थ इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात अदितीचा सत्कार करण्यात आला.
अदिती चाकणे ही प्रा. डॉ. असादा यांच्याकडे जैव अभियांत्रिकी व पर्यावरण या विषयांमध्ये पीएचडी करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले
यावेळी तिला मिळालेल्या या यशाचे चे कौतुक व्हायला हवे असे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी केले. तसेच या विषयात खूप संधी असून अदितीने लवकर डॉक्टर व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. आदिती ने, विद्या प्रतिष्ठान फर्ग्युसन महाविद्यालय व डी वाय पाटील विद्यापीठांमध्ये बायोटेक्नॉलॉजी चे शिक्षण घेतलेले आहे.
याप्रसंगी इंदापूर महाविद्यालयाचे कॉलेजचे प्राचार्य संजय चाकणे, श्री मनोहर चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते..