इंदापूर: काल इंदापूर शहर शिवसेनेच्या वतीने नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात इंदापूर शहरामध्ये विविध रोडवर असलेल्या खड्ड्यात बाबत शिवसेना आक्रमक होऊन या खड्ड्यात झाडे लावून व घोषणा देऊन निषेध व्यक्त केला होता व दोन दिवसात हे खड्डे बुजले नाहीतर याच खड्ड्यात संबंधित अधिकाऱ्यांना बसून जाब विचारला जाईल असा अल्टिमेट देऊन तालुक्याचे लक्ष शिवसेनेने वेधले होते.याच शिवसेनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने इंदापूर शहरात असलेले खड्डे बुजवण्याचा सुरुवात केली असून प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी या मजुरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
काल दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनास शिवसेनेकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सवाल केलता की , इंदापूर शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे यामुळे नागरिकांच्या जीवास धोके निर्माण झालेले आहेत या गोष्टीकडे इंदापूर नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांचे डोळे दृष्टीहीन आहेत का? त्यांना इंदापूर शहरातील वाहतुकीच्या रस्त्यांची दुरावस्था दिसत नाही का? इंदापूर नगरपरिषद शहरामध्ये सर्व नगरसेवक यांचे ही शहातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे का? नागरिकांचा जीव धोक्यात घालून नागरिकांकडून काय अपेक्षा करत आहात? त्यांचे हात – पाय मोडले पाहिजेत का? नागरिकांचा संसार उघडयावर आणण्याची वाट पाहत आहेत का? ते त्या खड्ड्यात पडून मरण पावलेले बघायचे आहे का? जर शासकीय अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांना त्या खुर्चीवर व पदावर बसण्याचा काही अधिकार नाही. शिवसेना त्यांना त्या खुर्चीवर बसू देणार नाही.
तसेच नागरिकांच्या भवितव्यासाठी ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते दोन दिवसात नाही बुजवले तर त्या खड्ड्यांमध्ये संबंधित शासकीय पदाधिकाऱ्यांना बसवल्याशिवाय राहणार नाही. हे इंदापूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी ध्यानात ठेवावे व तात्काळ इंदापूर शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती करांवी अन्यथा शिवसेना स्टाईलने अंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. ” अशा आशयाचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले होते.
आता प्रशासनाने याची दखल घेऊन कामास सुरुवात केली असल्याने शिवसेनेने केलेल्या मागणीस यश मिळाले असल्याचे दिसून आले. याबाबत शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, शिवसेना शहर समन्वयक अवधूत पाटील, बालाजी पाटील, गोरख कदम,राजू शेवाळे ,संजय खंडागळे, अशोक देवकर, मेजर सुनील पवार,सुधीर पाटील या सर्वांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.