इंदापूर: गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर शहरात अनाधिकृतपणे चालत असलेला भिसी व्यवसायाच्या चालकांनी आपापसात संगनमताने अफरातफर करून इंदापूर शहरातील व्यापारी,डॉक्टर्स,सर्वसामान्य नागरिक या सर्वांना कोटयवधीचा गंडा घातलेला आहे. सदर भिसीतील लोकांनी सुरुवातीस विश्वास संपादन केल्याने यात बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवले आहेत जवळपास हा आराखडा शंभर कोटीच्या आसपास आहे का असा अंदाज वर्तवला जात आहे अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांनी दिली.या फसवणूकीमुळे व दोन वर्ष लॉकडाऊनमुळे व्यापारी व सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. आता यात इंदापूर शिवसेनेने यात लक्ष घातले असून फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांनी आज सांगितले या सर्व व्यापाऱ्यांच्या तसेच भिसीत फसवणूक झालेल्या नागरिकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा राहील व त्यांना पैसे परत मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महादेव सोमवंशी यांनी सांगितले.
ज्या लोकांची जाणीवपूर्वक भिशी मध्ये फसवणूक झालेले आहे त्या सर्व लोकांनी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात येऊन माहिती द्यावी असे आवाहन इंदापूर शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांनी केले.सदरच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल व यातूनच सामान्य नागरिकांचे गुंतलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल असेही महादेव सोमवंशी यांनी सांगितले.
नुकतेच इंदापूर शहरातील एका नागरिकाने भिशीच्या पैशाच्या वादामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रकारही घडला होता. सुदैवाने त्या व्यक्तीची प्रकृती ठीक आहे परंतु सखोल चौकशी केल्यास अनेक कारणामे बाहेर येतील अशी शंका निर्माण झालेली आहे. आता शिवसेना व फसवणूक झालेले नागरिक यांची पुढची भूमिका काय असेल हे काही दिवसात समजेल.