इंदापूर : आज इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना ई श्रमकार्ड काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ माननीय अध्यक्ष अंकिता शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला.
नगरपरिषदेच्या प्रांगणात या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेले असून उद्यापासून वार्ड निहाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,साठेनगर या भागात नियोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून श्री सुभाष ओहोळ हे काम पाहत आहेत.शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. ई कार्ड काढण्यासाठी वयाची 16 वर्ष ते 59 वर्षे वयापर्यंत चे नागरिक लाभ घेऊ शकतात यासाठी आधार कार्ड मतदान ओळखपत्र बँक पासबुक व मोबाईल सोबत घेऊन यावा.