इंदापूर:इंदापुर शहरातील दत्तनगर रोड – शहा कार्यालय ते दत्तनगर परिसर भागातील अनेक नागरिक रोज या रस्त्यावरून जात असतात, अनेक वृद्ध व बालक या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी चालणे,फिरणे यासाठीही या रस्त्याचा वापर करत असतात ,परंतू सदर रस्त्याकडेला वाढलेली बाभळी व झुडपे ही लाईटच्या पोल वर पण गेली आहेत, जोरदार पावसात तिथे लाईट पोलच्या या तारांना या फांद्या लागल्या कि मोठ्या प्रमाणात स्पार्ककिंग होते. भविष्यात या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते ही गोष्ट नाकारता येत नाही अनेक वेळा या भागातील नगरसेवक , नगराध्यक्ष , नगरपरिषद मधील अधिकारी वर्ग व मुख्याधिकारी यांना या विषय तक्रार अर्ज केला आहे पण अद्याप प्रश्न सुटलेला नाही. असे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
पुढे ते म्हणाले की सदर असलेले झाडे झुडपे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली आहे व सदर रोड वरील शौचालय देखील नाही म्हणून या रस्त्यावर शौचालाची सुद्धा सुविधा होऊन आता हे दोन्ही विषय लवकर मार्गी लागवेत असे राहुल गुंडेकर म्हणाले.