इंदापूर शहरातील घराघरातून पाच हजार पत्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जाणार…वाचा सविस्तर.

इंदापूर: गेल्या अनेक महिन्यातून इंदापूरकर आणि इंदापूर नगरपालिका यांच्यातील संघर्ष शिगेला गेलेला दिसून येत आहे याचे कारण असे की इंदापूर नगरपालिकेने थकीत रकमेवर वाढवलेले अवाढव्य व्याज व शास्ती कर यामुळे यामुळे इंदापूरकरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा असंतोष लक्षात घेता शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका सीमाताई कल्याणकर व शहरप्रमुख अशोक देवकर यांच्या माध्यमातून व माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाच हजार इंदापूरकर पत्र लिहिणार असून या पत्रामध्ये मिळकत कर भरण्याची आमची तयारी आहे पण जसे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मिळकत करा वरील व्याज माफ केले आहे तसे इंदापूर नगरपालिकेचेही मिळकत करावरील व्याज माफ करावे या आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार आहे.
नगरपालिकेने आकारलेल्या आवाढव्य व्याज व शास्ती माफी करण्याकरिता महाराष्ट्रातून हा पहिलाच पत्राचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सीमाताई कल्याणकर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला दिली. या अभियानात शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते उद्यापासून घरोघरी जाऊन स्थानिक मालमत्ता धारकाकडून हे पत्र लिहून घेतले जाणार आहे.या पत्रात घर क्रमांक, त्याला आकारलेले व्याज त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल नंबर, सही या सर्व गोष्टी नमूद असणार आहेत.हे अनोखी अभियान राबवण्याकरिता निर्मला जाधव,ज्योती शिंदे,सोनम खरात,रूपाली रासकर,अमोल राजगुरू, अवधूत पाटील, सोनू ढावरे,रोहित पवार, दुर्वा शेवाळे इत्यादी पदाधिकारी या कामात हातभार लावणार आहेत.एकंदरीतच या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडून काही सकारात्मक निर्णय घेतले जाणार का? याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागून राहू शकते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here