इंदापूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
– शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल इंदापूर शहरवासीयांच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार
इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून रु.10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर शहराच्या वतीने इंदापूर अर्बन बँक मध्ये भव्य जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेच्या हिताचे डबल इंजिन आपले सरकार असून या सरकारच्या माध्यमातून इंदापूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
इंदापूर शहरवासीय तसेच पतंजली योग समिती, रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी, महतीनगर यांच्यावतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा यावेळी यथोचित जाहिर सन्मान करण्यात आला.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. शासनाच्या सर्व योजना नागरिकांसाठी प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.
माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, गटनेते नगरसेवक कैलास कदम, जयकुमार शिंदे , दत्तात्रेय अनपट , विशाल बोंद्रे , प्रा.सुनील सावंत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, भागवत गटकुळ ,माजी नगरसेवक शेखर पाटील, रघुनाथ राऊत, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे उपस्थित होतेसूत्रसंचालन इंदापूर शहर भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले.आभार स्वप्निल सावंत यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here